STORYMIRROR

Jairam Dhongade

Inspirational

3  

Jairam Dhongade

Inspirational

हनुमंत राया

हनुमंत राया

1 min
157

बलोपासना आणि भक्ती 

स्वामीनिष्ठा ज्याची शक्ती

युगात झाला तो लढवय्या

प्रणाम माझा हनुमंत राया!


अशक्य नव्हते तुजला काही

रिद्धी सिद्धी तुमच्या ठायी

विराजमान हृदयी रामराया

प्रणाम माझा हनुमंत राया!


अजरामर तू तिन्ही लोकी

राम कृपेचे वरदान डोकी

रघुकुलाची निस्सीम माया

प्रणाम माझा हनुमंत राया!


रुद्राचा तू अवतारधारी

भजती पुजती तुज नरनारी

राम दरबारी शोभे काया

प्रणाम माझा हनुमंत राया!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational