लेखन
लेखन
1 min
154
प्रसवाया शब्द भारी...
वाचनाशी सलगी कर,
जे आवडले मांडण्या ते...
पेनाची त्या हलगी कर!
काय भितो मांड सारे...
जे मनी ते सांड सारे,
व्यक्त कर तू भावनांना...
वाहू दे विचार वारे!
नको आकस, हेवेदावे...
लिही सकस मनोभावे,
कटू असते सत्य तरीही..
नकोस टाळू बारकावे!
मग पहा ते लिहिलेले...
वाजेलही.. गाजेलही,
लिहिले तसे वागले की...
सांगतो मी साजेलही!
