STORYMIRROR

Jairam Dhongade

Inspirational

3  

Jairam Dhongade

Inspirational

बुद्ध

बुद्ध

1 min
117

बुद्धास जा शरण तू तारेल बुद्ध नक्की

अन् घासही सुखाचा चारेल बुद्ध नक्की!


शरणांगतास छाया संघात प्रेम माया,

कारुण्य रोमरोमी भारेल बुद्ध नक्की!


सात्विक शुद्ध शांती धम्मात ठासलेली, 

सैराटल्या मनाला मारेल बुद्ध नक्की!


होतो उतावळा का तू पाळ पंचशीला,

साऱ्या व्यथा निराशा सारेल बुद्ध नक्की!


माणूस माणसा हो तू माणसाळ थोडा,

मग माणसात मित्रा पसरेल बुद्ध नक्की!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational