Participate in the 3rd Season of STORYMIRROR SCHOOLS WRITING COMPETITION - the BIGGEST Writing Competition in India for School Students & Teachers and win a 2N/3D holiday trip from Club Mahindra
Participate in the 3rd Season of STORYMIRROR SCHOOLS WRITING COMPETITION - the BIGGEST Writing Competition in India for School Students & Teachers and win a 2N/3D holiday trip from Club Mahindra

Anil Chandak

Drama


2.0  

Anil Chandak

Drama


माझी लेखणी

माझी लेखणी

1 min 334 1 min 334

माझी लेखणी माझा श्वास,

अंतरात्म्यातला,आवाज !

मनातील भावनांना, वाट देत,

विवेकाने चढवलेला साज !!


माझ्या, अनुभवाचा खजाना,

उतरतो, झरझर लेखणीतून !

विचारांचा ओघ वाहतो,

संचय झालेल्या मनांतून !!


षडरिपुंनी,प्रेरित आवेगातून,

स्फुट होणारा , उन्माद !

लेखणीतून,व्यक्त होणारा,

मनांतील अंतर्नाद !!


कधी ,अन्यायाने व्यथित,

झालेल्या मनाचा फुत्कार !

वेदनांनी कळवळणारा,

 सुलगत जाणारा अंगार !!


कधी आनंदाच्या लहरींनी,

उचंबळणारे, एक ह्रदय !

कधी दु: खाच्या तीव्रतेने,

अश्रु ढाळणारी माय !!


कधी तरल कल्पना करूनी,

अद्भुत , भावविश्व उभारी !

सैर सपाटा, वाचकाला ही

घडविती,गुंगवूनी ती सारी !!


जे न देखे रवी ते पाही,

साहित्यक लेखणीतूनी !

कधी रडवी करूणेने,

हसवी कधी,चुटकुल्यांनी !!


कधी प्रेम शृंगाराचे वर्णन,

करूनी स्वप्न रंजन करते !

मोरपिस फिरवुनी अलगद

मनांला गुदगुल्या ती करते !!


लोकमनांच्या भावनाचे,

प्रतिबिंब लेखणीने उतरविते !

दडपुनी न जाता झुंडशाहीने,

प्रसंगी,हौतात्म्य ही पत्करीते !!


Rate this content
Log in

More marathi poem from Anil Chandak

Similar marathi poem from Drama