STORYMIRROR

Anil Chandak

Others

3  

Anil Chandak

Others

धरणीला चुंबूनीया

धरणीला चुंबूनीया

1 min
245

आई तुझ्या, चरणांवरी, डोके ठेवतो!

धरणीला, चुंबूनीया, गुण तुझे गातो!!धृ!!


धरणीला आकाश, मिळते क्षितीजाला,

श्वास फुलते अमुचे, ऋतु खुललेला !!


मनी उपकार, सदैव तुझे स्मरतो!!1


मिटविते भूक तू, पिण्यांसी देते पाणी,

ओढे,नद्या, कलकल, गाती तुझी गाणी !


सप्तसुर धरूनीया गान तुझे गातो !!2




देते धान्य, आम्हांसिया, पोट भरण्यांसी!

वृक्ष, फुले फळांनी सजे, स्वाद घेण्यांसी !!


आई प्रेमाने आम्ही, बोट तूझे धरतो!!3


हिरे, माणके, खनिजांनी, भरली भूमी,

देई धन अपार, पुर्ण करते कमी! 


 क्षणोक्षणी,रूप नवे, ते तुझे पाहतो!!4



आम्ही तत्पर सदा, तू जेव्हां बोलविते!

तुजसाठी, मरण्यां भिती नाही वाटते !!


जरी बालके आम्ही, मोल तुझे जाणतो !!5


गेली शतके जरी, टिकुनी आहे शान!

एक शब्द टाकता, किती झाले कुर्बान!


वार आम्ही तुझ्या, अंगावरचे झेलतो !!6



Rate this content
Log in