बलिदान क्रांतीकारांचे ...
बलिदान क्रांतीकारांचे ...
खेळली रक्ताची होळी ,
रक्ताने माखली क्रांतिकारांची टोळी,
हृदयात होती आखलेली,
स्वातंत्र्याची खेळी ...
तप्त निखारे तपले,
गुलामगिरी ची श्रृखंला तोडण्या,
विळख्यातुन इंग्रजांच्या काढण्या ,
विर ते फासावर लटकले ...
आजन्म ज्यांनी भोगला कारावास,
व्यर्थ न जाणार बलिदान ,
सदैव मनी त्यांचा सन्मान.
बलिदान क्रांतिकारांचे स्मरणात ठेऊ ,
कार्य जे त्यांनी योजीले,
भारत भुमीला स्वंतत्र केले...
आज जे श्वास मोकळे घेतले,
तुमच्या आमच्या श्वासांवर
ऋण त्यांचे चढले ,
हक्क स्वातंत्र्याचा ,
स्वतंत्र भारताचा ,
हुकूमशाहीचा शिरच्छेद केला,
तेव्हा स्वातंत्र्याचा सुर्य उगवला,
पाया नव्या आशेचा रचला,
भारत अजरामर झाला,
चढला बलिदानाचा मुलामा ,
स्वतंत्र भारत चमकला...
वेड्या स्वातंत्र्यविरांनी,
पर्वा न केली कशाची,
भेट अनमोल देऊन नव्या पिढीला,
म्हणे साकारा भारत स्वप्नातला ,
प्राण हसत त्यागले ...
बलिदान क्रांतिकारांचे ,
बलिदान क्रांतिकारांचे स्मरणात ठेऊ ,
कार्य जे त्यांनी योजीले,
भारत भुमीला स्वंतत्र केले...
खेळली रक्ताची होळी ,
रक्ताने माखली क्रांतिकारांची टोळी,
हृदयात होती आखलेली,
स्वातंत्र्याची खेळी ...
