कसा गुलाब रंगुनी गेला...
कसा गुलाब रंगुनी गेला...
काटेरी कुंपणातही कसा गुलाब रंगुनी गेला
नजर ठेऊनी त्यावर किती पण तो दंगुनी गेला...
उन वारा पावसाचा जोर सोसला त्यांने जरी
रंग उतरता उतरला ना गडद लाल रंग चढूनी गेला...
हा रंग कुणाचा कसा ओठी फुलला असा ,सांग ना
लपले मनात हसले ओठात ते गुपित लपवुनी गेला...
शब्द माझे कमीच भासे तु कधीचा अबोल वाटे
पण जादू झाली ती कळली तो डोळ्यांनी बोलुनी गेला...
आता नको हे पिसे एकट्यात मन गालातल्या गालात हसे
एकटा तो पाकळ्या नाजुक अन् ठेच मनाची गळूनी गेला...

