चालुया, आल्या अडचणी जरी...
चालुया, आल्या अडचणी जरी...
तू श्वासांचे धागे तोइून
विसाव्याला नको जाऊ
मी आहे अजुनही सोबत
चल जरासा विसावा घेऊ...
समुद्राच्या शांततेत
चल हरवुन जाऊ
गाज ऐकू आली तरी
ना भानावर येऊ...
असे कितीसे क्षण
सोबती आपण जगू
प्रवास असेल जेवढा
ऐकमेकांच्या साथीने निघू...
समांतर कधीच नव्हत्या
वाटा आपल्या तरी
निवडला मार्ग तोच
चालूया, आल्या अडचणी जरी...

