रक्तांच्या धाग्यांनी...
रक्तांच्या धाग्यांनी...
रक्तांच्या धाग्यांनी
गाठले हे बंध
बहिण भाऊ म्हणजे
एक मन एक छंद
माझ्या पाठी तू की
तुझ्या पाठी मी
एकाच गर्भ मंदिराची
पायरी तू अन् मी...
बोबड्या बोबड्या बोलांनी
भांडणे केली किती
संकटात आली धावुनी
हीच पवित्र नाती...
बहीणरुपी आई
अन् बापरूपी भाऊ
सावली असे त्यांची
आशीर्वाद रुपी पाहू...
