तुला चालायची वाट...
तुला चालायची वाट...
परिश्रमाला नाही तोड
मन लावून मेहनत कर
बाधा बनणारा आळस सोड
यशस्वी जीवनाचा मंत्र आठव
तुला चालायची वाट आपले स्वप्न साठव...
चालत जा वाट जोरात
की हळूहळू जशी चालायची चाल
थकून थांबू नकोस परत फिरू नकोस
एक दिवस ध्येय गाठ
अपयशाला करुनी पाठ
यशस्वी जीवनाचा मंत्र आठव
तुला चालायची वाट आपले स्वप्न साठव...
म्हणूनच सांगतात संत
केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे
कार्यातच आपला राम असला पाहिजे
हाच यशस्वी जीवनात मंत्र आठव
तुला चालायची वाट आपले स्वप्न साठव...
