तोडून पाश मनाचे...
तोडून पाश मनाचे...
तुटका तुटका जीव झाला
सांभाळला किती गेला
मी मन स्वाधीन केले त्याला
तोच रक्षणकर्ता मेला...
हातात घेउनी हात त्याने
मागले मला असण्याचे पुरावे
मी वेडी प्रेमात वेडावले गाणे
शेवटचा श्वासापर्यंत ना दूरावे...
काळ थांबला त्यांने जाणला
का? तोडून पाश मनाचे
क्षण सोबतीचा हरवून आणला
आता शोधते मी तरी सापडेना...
दुष्काळ जीवनाचा सोसवेना
भार मनावर झाला प्रेमाचा
भकास आयुष्याची माती बघाना
बिज कोणतेच आता उगवेना...

