वाट सावजाची आहे...
वाट सावजाची आहे...
अंधारलेल्या सावल्या या
वाट धरुनी वाट पाहे
जाऊ नको तू त्या रस्त्यावरती
तुटलेल्या मनाची आह आहे...
हुंदका फुटला टाहो गर्जुनी
आभाळ फाटले आहे
विजा जणू तलवारी तिथे
वाट सावजाची आहे...
घोर मनाला भोर नाही
रात्रीस खेळ चाले
घाव तिथले जीवघेणे
भोग कशाचे वाट्याला आले...
सोसले किती त्या सावल्यांनी
अश्रुंचेही बाष्प झाले
मनी कुरवाळलेले स्वप्न कधी
पाचोळ्यागत उडले...
