STORYMIRROR

Manisha Wandhare

Abstract Romance

4  

Manisha Wandhare

Abstract Romance

तरी का? उमलेना...

तरी का? उमलेना...

1 min
37

बहर आला कळीला
तरी का? उमलेना
पाकळी पाकळी गुरफटलेली
खुलता कळी खुलेना...

फुलपाखरू ते वाट पाही
रंग खुलवून घिरट्या घेई
आनंद उधळला सभोवताली
ती हसून थोडे घेईना
खुलता कळी खुलेना...

राग कशाचा डोळ्यात पाणी
शब्द मिटूनी ओठात' आणि '
सूर छेडूनी का? गीत गाईंना
 खुलता कळी खुलेना...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract