आठवून झाले...
आठवून झाले...
नेहमीच त्यांना
आठवून झाले
नेहमीच त्यांना
पाठवून झाले
माझे काय ते
साठवून झाले
वेडेवाकडे सरळ
आपले थोडे
वाकवून झाले
येता जाता
कौतुक त्यांचे
वठवूण झाले
बघा तेवढीच धमक
आता नरमून झाले
ताशेरे ओढले कुणी
गरमून झाले
इथे गून्हा कुणाचा
तरी हमसून झाले
रोबोटिक जगात या
कुणी नाही कुणाचे
बोलूण झाले
हसणे रडणे
बेमालूम झाले
दिखाव्याचे
शरमून झाले...
कोण ओळखीचे
सर्व नामालूम झाले
दुःख डोळ्यातच
मजलूम झाले...
