दरी...
दरी...
खूप मोठी दरी
तुझ्या माझ्यात आहे
मी ऐलतिरी उभी
अन् तू पैलतिरी आहे...
मी बिलगुन मातीला
तू उमलणार फुल आहे
तुझ्या माझ्यातले अंतर
समांतर अवांतर आहे...
मी सुकलेला मोगरा
तू निशिगंध हळवा आहे
मी काजवा मिणमीणता
तू लखलखणारा शुक्रतारा आहे...
मी कल्पना अधोरेखित
तू मानसीचा चित्रकार आहे
मी जादूगार म्हटलं तर
तू मनाचा चमत्कार आहे...
अशक्य या नात्याची
विन तरीही घट्ट आहे
मी रचलेली कविता अन्
तू गवसलेला सूर आहे...

