STORYMIRROR

Mrudula Raje

Inspirational

4  

Mrudula Raje

Inspirational

षष्ठ्यब्दीपूर्ती

षष्ठ्यब्दीपूर्ती

1 min
371

झाली षष्ठ्यब्दीपूर्ती, आज गाठली तुम्ही साठी।

 अजून चाळीस आपल्या हाती ;

साहित्य, संगीत , कलागुणांचा विकास करण्यासाठी ॥


साठी नंतरची परिपक्वता हीच ज्येष्ठत्वाची अस्सल खूण ।

पिकलेल्या आंब्यासच लाभतो रसाळतेचा मधुर गुण ॥


पौर्णिमेच्या पूर्ण चंद्रासच मिळतो जगी परिपूर्णतेचा मान ।

अष्टमीच्या अर्ध्या रात्रीला नच लाभे स्वयंभू चंद्राची शान ॥


आयुष्यातील दु:खद क्षणांची करून टाका वजाबाकी।

साठाव्या वाढदिवशी नव्या संकल्पांनी लावा जीवन सार्थकी ॥


हीरकमहोत्सवी वाढदिवस तुमचा करा साजरा थाटाने ।

शतायुषी आयुष्याच्या पाय-या पुढे चढत राहा तुम्ही मानाने ॥


आयुष्याच्या ह्या वळणावर क्षणभर घ्यावी विश्रांती ।

प्रेरणा, उर्जा अन् शक्तीची शिदोरी घेऊन, साधावी पुढे प्रगती॥ 


 गाठायाची आहेत तुम्हाला यशकीर्तीची किती शिखरे ।

शतायुषी जीवन मार्गावर रचत राहा साफल्यसिद्धीचे मनोरे ॥


वाढदिवस करतो आयुष्यातील आनंदाचा गुणाकार ।

जीवन व्हावे सफल,संपूर्ण हीच शुभेच्छा देते वारंवार ॥



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational