करुनी युद्ध काय हासील
करुनी युद्ध काय हासील
करुनी युद्ध काय हासील, प्राण घेऊनी कित्येक
उद्ध्वस्त जीवन कित्येकांचे, मातीत जाई अनेक
शांतमय जीवन सुंदर, सुखकर वाटे निरामय
नको भांडणे नको ते तंटे, जगाशी नसावे कोणते भय
रक्तपात नको कुणाचा, नको पूर तो आसवांचा
विचारिक तू हो मानवा, नको करू खेळ भावनांचा
ठेऊनी मानसन्मान, वागूनी नित्यनियमाने
जनहित सर्व जगाचे, जगावे जीवन आदराने
