STORYMIRROR

Sarika More

Tragedy

3  

Sarika More

Tragedy

बंदिस्त भावना

बंदिस्त भावना

1 min
64

हसरी आनंदी भावना

खट्याळ कधी गोंधळ करी

खरे तिचे पटवूनी सांगे

बोलता मावळला दिन जरी

मोठी होऊन घेतली हाती

लवकरच तिने जबाबदारी

मेहनत मनं लावुनी करते

वयाने लहान असली तरी

छोटे मोठे स्वप्न होते तिचे

पण लग्न करून घर सांभाळीले

इच्छा आकांक्षा सोडून सर्व

घर संसार स्वर्ग मानिले

वर्षानुवर्षे कामात रमली

तरीही कोणी उगाच द्वेष करी

बोलण्याची मुभा नां तिला

छळ कपट कुणी केले जरी

भावनाने भावना मारून

हरविले स्वतःचे अस्तित्व

कुठे दिसेनां हसरे रूपं ते

जणू झाली भावना बंदिस्त 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy