मुलं
मुलं
सृष्टीत ह्या सुंदरश्या
आशीर्वाद जसा भगवंताचा
नशीब वाटते उजाळले
जीवनी मुलं क्षणभाग्याचा
गोड हसू रूप गोड
घरात येता गोंडस बाळ
जगण्याला येई नवं उमेद
हृदयासोबत जोडली जाई नाळ
अवघे जग हे बहरते
मनोमनी हे नाचते गाते
सौभाग्याने माता पित्यांची
फुले सुखाची उमलून जाते
घरोघरी नाद निनाद
खुळखुळे खेळणी पाळना
घरभर आनंदी आनंद
रमवितात मुलं स्वतःत सर्वांना
