STORYMIRROR

Sarika More

Tragedy

3  

Sarika More

Tragedy

खेळ नजरेचा

खेळ नजरेचा

1 min
39

खेळ नजरेचा असे असा

कित्येकांच्या बदलल्या दिशा

बऱ्या वाईट अनुभवातूनी

कधी आशा कधी निराशा

निर्मळ दृष्टी सर्वांप्रति ठेवुनी

घात कधी तिथेच होई

सांभाळूनी पाऊल टाकता

गतिमंद हिनऊनी जग दोष देई

संकट टाळू कसे की

कधी संकटच येणार नाही

खबर कधी जगाची घेऊनी

होऊन बेखबर कधी शांत राही

विचारसरणी ह्या जगताची

कसं तुमचं गैर मांडण

थांग लागेना कुणा कशाचा

नित्य चाले झगडे भांडण 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy