STORYMIRROR

Sakharam Aachrekar

Romance Tragedy

4  

Sakharam Aachrekar

Romance Tragedy

किनारा

किनारा

1 min
223

तुझ्या सावलीसवेचा भास मीच आहे 

तुझ्या चेतनेचा श्वास मीच आहे 


झंकारेन क्षितिजासह सर्व दाही दिशांना

या अमर प्रीतीचा निनाद मीच आहे 


कवेत असतील तुझ्या क्षण कोवळे सुखाचे 

अबोल त्या दुःखाचा आवाज मीच आहे 


श्रावणात हृदयावर आता घन कोसळू लागले 

तुझ्या वाहत्या आसवांचा कर्जदार मीच आहे 


सरिता पाषाणांच्या पाशात गुंतेल केव्हा 

तुझ्या आठवणींचा वाहता झरा मीच आहे 


जाण गेलीस तू, जरी दूर समुद्रापरी

प्रीतकिनारा तुझा अंततः मीच आहे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance