STORYMIRROR

Sakharam Aachrekar

Others

2  

Sakharam Aachrekar

Others

श्रावण आला

श्रावण आला

1 min
117

इंद्रधनूने पश्चिमेकडे, रंग अनोखे हे भरले

जलबिंदू स्वरसाज लेऊन, पहा कसे ओठी स्फुरले

 

वसुंधरेने अंगावरती, हिरवा शालू पांघरला

शिखरावरती मेघांनी या, मुकुट निळा वाटे धरला


रंग सातही मेळ करूनी, कमान गगनी कोण धरे? 

मातीमध्ये अत्तरापरी, गंध साजिरे कोण भरे? 


नदी कालवे ओढे नाले, अता लागले पूर्ण भरू  

कागदहोडी पाण्यावरती, बालमनांचा खेळ सुरू 


अवचित येई श्रावण धारा, कौलावरती ताल धरी 

कसा काननी मोद मयूरा, फुलारून तो नृत्य करी 


सूर्यरथाचे दर्शन होते , कधी दिसे श्रावणधारा

ऊनपाऊस संगम करण्या, अवतरतो श्रावण न्यारा 


काल पाहिले स्वप्न प्रियेचे, इंद्रप्रिया ती होती का? 

स्वप्नामधली राजकुमारी, श्रावण कन्या होती का? 


Rate this content
Log in