STORYMIRROR

Sakharam Aachrekar

Tragedy

2  

Sakharam Aachrekar

Tragedy

ती फुले

ती फुले

1 min
125

हासती अद्याप कैसी, वाळलेली ती फुले

मी तुझ्या केसात तेव्हा, माळलेली ती फुले


साक्ष जी होती कधी, प्रीतीक्षणांची आपुल्या

का स्मृती जपती उरी, कोमेजलेली ती फुले


(ताटवा येई फुलोनी तो सुगंधी आजही 

लाजली होतीच ना तेव्हा कपोली ती फुले) 


रेशमी तव स्पर्शमात्रे, ही शहारे पाकळी

की तुझ्या स्पर्शात होती, गुंगलेली ती फुले


(रेखीशी तू पापण्या, नादावला हा आरसा

पांघरू मी रात्र की मज, तू दिलेली ती फुले) 


नावही बदलून तू, गेलीस आता दूर गे

मी तरी हृदयात या, सांभाळलेली ती फुले 


गोड त्या विश्वात वेड्या, घेउनी जाती मला 

त्या तनाच्या मोरस्पर्शे, धुंदलेली ती फुले 


भंगलेली चार गीते, हीच पुंजी जीवनी

सोबती निर्माल्य रूपी, ठेवलेली ती फुले 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy