STORYMIRROR

Sakharam Aachrekar

Abstract Tragedy

3  

Sakharam Aachrekar

Abstract Tragedy

उगाच तेव्हा

उगाच तेव्हा

1 min
294

पाहून दर्पणी तुज, हसलो उगाच तेव्हा

कळले न भास ते मज, फसलो उगाच तेव्हा 


सारे तुझे बहाणे, मजला कबूल होते

नच माहिती कसा मी, रुसलो उगाच तेव्हा 


झुंजूर पाहता हे, तारे फितूर झाले

मी एकटा नभी या, उरलो उगाच तेव्हा 


सारा तुझ्यासवेचा, वाहून काळ गेला

वाहवुन आसवे मी, रडलो उगाच तेव्हा


पाहूनही मला तू, का पाहिलेच नाही

मी अंतरी जरासा, ढळलो उगाच तेव्हा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract