STORYMIRROR

Aditi Bahutule

Abstract

4  

Aditi Bahutule

Abstract

शून्य म्हणजे काय

शून्य म्हणजे काय

1 min
502

शून्य म्हणजे काय

म्हटल तर एक अंक,

'शून्य' किंमतीचा

पण जमली जोडी दुसऱ्यासंगे 

की लागतो दिसायला आलेख चढतीचा


शून्य म्हणजे काय

म्हटल तर एक छोटासा गोल

पण या छोट्या गोलाशिवाय

साऱ्या अंकगणिताचे 'शून्य' मोल


शून्य म्हणजे काय

सगळ्यांना नको असलेली गोष्ट

पण सॅलरी चेकवर मात्र

जेवढी जास्त तितकी मस्त


शून्य शिकवतं काय

जीवनातला एक महान धडा

एकट्याची किंमत 'शून्य'

म्हणूनच दुसऱ्याच्या मदतीने दोघेही वाढा


परिक्षेत मार्क, 'शून्य' नको

नापास विषय मात्र 'शून्यच' हवा

माणूस अक्कल'शून्य' नको

तर शून्यातून विश्वनिर्माता हवा


थोडक्यात शून्य म्हणजे काय

मला तर शून्य मिठासारख वाटतं

नुस्त कोणालाच नकोसं

पण चवीसाठी सर्वांत हवं हे पटतं


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract