STORYMIRROR

Nilesh Jadhav

Abstract

4  

Nilesh Jadhav

Abstract

देवा.. तू कधी भेटलाच नाहीस

देवा.. तू कधी भेटलाच नाहीस

1 min
389

कित्येकदा तुझ्या पाय-या चढलो...

तुझ्या बद्दलच्या कित्येक गोष्टी ऐकतच मोठा झालो...

पण खरं सांगू का देवा...?

तू कुठं भेटलाच नाहीस...


भुकेने व्याकुळ झालेले पाहीलेत मी तुझ्या दारी...

आणि तिथेच पाहीलेत दानपेटीत दान करणारे दानकरी...

पण खरं सांगू का देवा...?

तू तिथे दिसलाच नाहीस...


मुर्तीकाराने जिव ओतुन तयार केलेली तुझी मुर्ती नजरेत भरली...

मंदीराच्या भिंतीवरची कलाकुसर मनास भावली...

पण खरं सांगू देवा...? 

तू कधी भावलाच नाहीस...


जेंव्हा कधी पाहीलय तुला तू दगडाचाच होतास...

निःशब्द आणि स्तब्ध ऐका जागेवर ऊभा होतास...

तरीही देवा खरं सांगू का..?

तू मला सापडलाच नाहीस...


तुला घातलेला हार पाणी मारुन ताजा होतो...

एक नारळ किमान विस वेळा विकल्या जातो...

हे कळालय केंव्हाच

पण देवा तू आहेस तरी कसा...? 

कारण मला अजुन कळालाच नाहीस...


खरच देवा आहेस का रे तू...?

मग् अजुन कसा भेटलाच नाहीस...?


(कृपया मनावर घेऊ नये... ही कविता काही अनिष्ठ रुढी विरोधात आहे..)


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract