STORYMIRROR

Nilesh Jadhav

Romance

3  

Nilesh Jadhav

Romance

तू जगणं शिकवलंस

तू जगणं शिकवलंस

1 min
197

बघ ना 

हा पाऊस 

बेधुंद होऊन बरसतो ना

तेंव्हा उन्हाने त्रासलेली श्रुष्टी

कशी नवचैतन्य ओढून घेते

असंख्य जीवांना खरं तर ती जागं करते

आणि जगायला शिकवते

ही सर्व कमाल असते ती पावसाची

(काही ठिकाणी हा पाऊस जीवघेणा ठरतो तो भाग वेगळा)

खरं तर मुद्दा असा आहे की 

तुझी भेट ही पावसातलीच 

या आधीही तुझं भेटणं झालं होतं 

पण या वेळेची तुझी भेट नव्याने झाली

आपल्यातली मैत्री वाढली

मैत्रिपोटीच का होईना 

पण समरस होऊन प्रेम करणं वाढलं

जवळीकता, मिठी, चुंबन, 

या सर्वांची ओढ वाढली

खरंतर हा भाग सोडला तर 

काळजी करणं, आधार देणं, समजून घेणं

याच गोष्टी महत्त्वाच्या ठरल्या

यातच माझ्या कविता रंगल्या

आणि त्या तू वाचून आनंदी झालीस

तुझं बहरणं

तुझं हसणं

आणि महत्वाचं तुझं माझ्या जीवनात असणं

या गोष्टी माझ्या प्रेमाच्या प्रतीक झाल्या

मी जरी तुला हसणं शिकवलं असलं तरी

तू मात्र मला जगणं शिकवलं आहेस

काय ग..?

वाचतीयेस ना...?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance