STORYMIRROR

Nilesh Jadhav

Romance

3  

Nilesh Jadhav

Romance

म्हणून...

म्हणून...

1 min
248

तू उधार देशील का मला 

तुझ्या अंगणात कोसळणारा तो पाऊस

कारण प्रेमाचे अंकुर जे उगवून आलेत 

नकळत माझ्याही

त्यांना मला जपायचं आहे....

तुझ्या आठवणींच्या थव्यांनाही आता

प्रेमात अखंड बुडून जायचं आहे....

रानोमाळ हिंडणाऱ्या मनपाखराला

तुझ्या प्रेमाचं पावसाळी गाणं गायचं आहे...

आठवणींची वाट तुडवून 

मी रोज पोहचतो तुझ्या मनापर्यंत

तुझ्या मनालाही मला सोबत घ्यायचं आहे...

उन्हात झिरपत गेलेल्या 

भूमिगत ओलाव्यालाही आता

खळखळून वहायचं आहे....

तू, मी आणि पाऊस

विलक्षण हे नातं, 

मनोमन जगायचं आहे...

तुझ्यासवे मला एकदा 

या पावसात चिंब होऊन भिजायचं आहे....

म्हणून....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance