STORYMIRROR

Nilesh Jadhav

Romance

3  

Nilesh Jadhav

Romance

स्वप्न तुझं माझं

स्वप्न तुझं माझं

1 min
240

हवेत असेल गारवा तेव्हा

मिठी होत जाईल आणखी घट्ट.

बाहुपाशात एकमेकांच्या 

बंदिस्त होण्यासाठी मनाचा हट्ट.


हेच स्वप्न माझं 

अगदी सारखंच तुझंही

तलमळतं जसं मन तुझं

अगदी तसंच झुरतं माझंही


भेटू यात रिमझिम पावसात

येताना तू पाऊस घेऊन ये..

वाट साचलेल्या नजरेला

तू प्रेमाचा ओलावा दे..


मी ही अडवून ठेवेल

क्षणभर त्या पावसाला

तू मात्र सावर सखे

उधाणलेल्या माझ्या मनाला...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance