एक भेट..
एक भेट..
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
डोळ्यांत आसवांची गर्दी
असते पुरी का..?
वाटते हवीहवीशी
नेहमी तू जरुरी का..?
तुझ्या नावाची या मनावर
इतकी मग्रुरी का..?
ओढ तुझ्याशी मजला
एवढी गहीरी का..?
भेटण्यास आतुर खरा
पण वाट्याला ही मजबुरी का..?
एक भेट तुझी माझी
अशी अधुरी का..?