STORYMIRROR

Nilesh Jadhav

Romance

3  

Nilesh Jadhav

Romance

पाऊस आहे तुझ्यासारखाच

पाऊस आहे तुझ्यासारखाच

1 min
204

बरसत रहातो उगाचच,

आठवणीत नेहमी तुझ्या

भिजवून मला टाकतो.

पाऊस आहे तुझ्यासारखाच,

जशी तू तसाच तोही मला छळतो.


कधी रिमझिम कधी मुसळधार

अगदी हवा तसा कोसळतो.

प्रत्येक वेळी वेगळ्या रुपात

आणखीनच तो भावतो.

पाऊस आहे तुझ्यासारखाच,

जशी तू तसाच तोही मला छळतो.


तुझं कोसळणं, 

माझं बरसत रहाणं,

भेटीसाठी एकमेकांच्या

आपलं कासावीस होणं.

पाऊसच तर आहे जो सर्व जाणतो.

तुझ्या चेहऱ्यावरुन ओघळताना

माझ्या मनात अलगद उतरतो.

पाऊस आहे तुझ्यासारखाच,

जशी तू तसाच तोही मला छळतो...



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance