STORYMIRROR

Nilesh Jadhav

Drama

3  

Nilesh Jadhav

Drama

आठवणींच्या पावसात

आठवणींच्या पावसात

1 min
180

आठवणींनाही आता

पावसावर सोपवून,

त्यांचं बरसत रहाणं

त्यांच्याकडूनच मागून घेतो...


आणि बरसत रहातो 

उतरतो शब्दांशब्दात,

कोऱ्या वहीच्या पानाला

कवितेचं दान देतो...


सय होता मजला तुझी

भेटीची आस दाटून येई

भरून आलेल्या डोळ्यांसह

पावसात हरवून जातो... 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Drama