STORYMIRROR

Dipti Dakhane

Drama Others

4  

Dipti Dakhane

Drama Others

एकदा माझी कविता बंद पडली

एकदा माझी कविता बंद पडली

1 min
236

एकदा माझी कविता बंद पडली

जणू तिच्यावर मुसळधार वीज कोसळली 

चालत चालेना, बोलता बोलेना,

हसेना की रडेनावाऱ्या संगे डोलेना,

रिमझिम पावसात भीजेना एकदा माझी कविता बंद पडली

एरवी अलगद भावना तिला हुरूप देऊन जायची

किंवा वैतागलेले मन तिला स्थिर करून जायचे

मुळात हळवी माझी कविता मलाच धीर द्यायची 

भूतकाळातल्या वेदनांच्या आभासात ती जकडली 

एकदा माझी कविता बंद पडली

एकही अश्रू गळेना ओठांची कळी खुलेना

न कशाची भीती, कसला मोह नसेना 

अश्या भावनाहीन वाळवंटात ती हरवली

 एकदा माझी कविता बंद पडली

खर न सांगता सत्य कस मांडावं 

सुखाच्या क्षणांचं कवच कसं पाखडावं

काटेरी कुंपणात पाखरू जसं अडकावं 

ऐकही हुंदका न देता ती खूप खूप रडली

एकदा माझी कविता बंद पडली

फार काळ नाही, ३-४ झाले आठवडे

तिने बांधून तयार ठेवले असेल गाठवडे

मैत्रिणीच्या काव्याने केली थोडी गुदगुली

पर्वतांचा बांध तोडून सरिता जशी खळखळली 

अशी एकदा माझी कविता होती बंद पडली


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama