STORYMIRROR

Rushikesh Kolhe

Drama Others

3  

Rushikesh Kolhe

Drama Others

थांब ना रे

थांब ना रे

1 min
232

 पावसा पावसा थांब ना रे 

का करतोयस आमची अशी दैना रे

थोडा तरी विचार करून बघ ना रे 

आतातरी बरसायचं थांबना रे 


 खूप बरसलास आता तरी 

थोडी विश्रांती घे 

आमच्या शेतातल्या पिकांना 

जगण्याची थोडी संधी दे 


  नको करू असे नुसकान रे 

 लहान लहान रोपे वाहून जातील ना रे

थोडा तरी विचार करून बघ ना रे 

आतातरी बरसायचं थांबना रे 


 लहान लहान रोपांसाठी 

तळमळतोय शेतकऱ्यांचा जीव रे

शेतकऱ्याला काळजी पडली 

कधी बरसायचा थांबतोस तु रे


 पावसा पावसा थांब ना रे 

का करतोयस आमची अशी दैना रे

थोडा तरी विचार करून बघ ना रे 

आतातरी बरसायचं थांबना रे 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Drama