ये पिल्लू, आय लव्ह यू...
ये पिल्लू, आय लव्ह यू...
माग माग पळतय,
पुढ पुढ करतय,रुबाब दावतय,
शायनिंग मारतय,गालात हसतय,
कारट पिल्लुच्या प्रेमात पडलय,
कारट पिल्लुच्या प्रेमात पडलय....।
झोपल्यावर पिल्लु पिल्लु करतय
जानु जानु सारखच बोलतय,
दिवाण्यावर पडतय
उशीला मीठीत घेतय
सारखच सपनात जातय,
पुर पुर पागल झालयं,
दिस रात फोनवर बोलतय ,
सारखच एसएमएस करतय
कारटं पिल्लुच्या प्रेमात पडलय
कारटं पिल्लुच्या प्रेमात पडलय...।
पिल्लुची चेष्टा करतय
कॅडबरी देऊ का नको म्हणतय
तपल
्याच तोंडात घालतय
अन् खा खा म्हणतय
कारटं भलतच मजा करतय
पिल्लुच्या प्रेमात पडलय
कारटं पिल्लुच्या प्रेमात पडलय
कारटं पिल्लुच्या प्रेमात पडलय...।
कारटं वर भिताडावर बसतय
जाताना येताना हात वर करतय
हाताची पप्पी देतय
येती का इकडे म्हणतय
तिच्या घरापुढून चकरा मारतय
तिच्या बापाला मामा मामा म्हणतय
लईच येड्यवाणी करतय
पिल्लुच्या प्रेमात पडलय
कारटं पिल्लुच्या प्रेमात पडलय...।