वळना
वळना
1 min
211
खोटं काय खरं काय
काय बी कळना
जीवन सुखाकड का वळना
जीवन आनंदान का खुलाना
दुःखाचा डोंगर सारा ओला झाला
तरी कोणी सुद्धा वळून भी बघना
दुःखाचं गाठोडं सरता सरना
सुखाच गाठोडं समोर का येइना
खोटं काय खरं काय
काय बी कळना
ही जिंदगी अशी कशी
गोड कडु आडमार्गी खुशी
आधी बोलून जाती
मग विचार करती
ही जिंदगी अशी कशी
खरं काय खोटं काय
काय बी कळना
जीवन सुखाकड का वळना
