धीर धर माझ्या राजा धीर धर
धीर धर माझ्या राजा धीर धर

1 min

12.6K
धीर धर माझ्या राजा धीर धर
घाई नको करू घाई नको करू
पडू दे आणखी थोडा पाऊस
साचू दे पाणी वाहू दे नदी-नाले
धीर धर माझ्या राजा धीर धर
धीर धर माझ्या राजा धीर धर
देवाची कृपा तर आहेच आपल्यावर
पाऊस येईलच अशी आशा करू
पण आता तरी थोडा धीर धरू
घाई नको करू घाई नको करू
माझ्या राजा लगेच नको घाई करू
मोती मोल बियाणे फुफाट्यात नको कालू
पडू दे आणखी थोडा पाऊस
मग जोमात पेरणी चालू करू
घाई नको करू घाई नको करू