STORYMIRROR

Rushikesh Kolhe

Inspirational Others

3  

Rushikesh Kolhe

Inspirational Others

फुलणाऱ्या कळीला फुलु द्या

फुलणाऱ्या कळीला फुलु द्या

1 min
11.8K

फुलणाऱ्या कळीला फुलू द्या 

तिचं फूल होऊ द्या 


तिचे निर्णय तिला घेऊ द्या 

तिचा विचार तिला करू द्या 

तिचं जीवन तिला जगू द्या 


फुलणाऱ्या कळीला फुलू द्या 

तिचं फूल होऊ द्या 


तिचे विचार जागू द्या 

स्वातंत्र्यावर तिला जगू द्या


फुलणाऱ्या कळीला फुलू द्या 

तिचं फूल होऊ द्या 


म्हणू नका आहे ती अज्ञान 

जाईल पुढं भेटेल तिला ज्ञान 


विचार अनुभव नाही सोडत साथ 

वावरु द्या तिला समाजात 


नका करू लोकांचे विचार 

स्वतःचा स्वतःच व्हा आधार 


नको राहू कोणाच्या आधारावर 

नको जगू कोणाच्या विचारावर 

प्रयत्न कर स्वतःच्या जीवावर 


बास कर जगायचं अंधारात 

अंधारानंतर दिवस येतो उजेडात 


स्वातंत्र्य भर तुझ्या मनात 

ताकद आहे तुझ्या मनगटात 


पाऊल टाक प्रकाशात

पाऊल टाक प्रकाशात


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational