मनातलं पाखरु
मनातलं पाखरु


माझ्या लाडाचं पाखरु तु
मनातलं पाखरु तु
भासातील सावली तु
मनातलं मन तु
तुझा श्वास माझा प्राण तु...।
मलाबी तुझच याड लागुन
माझा बी जीव गेलाय त्यागुन
नटलीया भरभरुन
सजलीया वरवरुन
गेलीया तु मलाच पाहून
मी ग गेलोय तुलाच लाजुन
आता कस गं दाखवु जगुन तुझ्या वाचुन
माझ्या लाडाच पाखरु गेलंय उडुन...।
ऐकून तुझी ती सबब
पाहुन तुझा त्यो रुबाब
लईच वाढलाय थाट
तुझ्या माग माग पळुन
जींदगी झालीया झाट
माझ्याकड बघना
माझी लागलीया वाट
पाहून तुला गेलोय
ा पुरतं,
न्हवुन गेलोया भलत
तु भेटत होती सतत,
बघत होती हसत
म्हणूनच मी पडलो तुझ्या प्रेमात ...।
आता सपनात माझ्या तुच फीरती गं
उठत बसत माझ्याच पुढं येती गं
अन् करतीया जीवनाची मस्ती गं
घेतीया थोडीशी धास्ती
अन् आयुष्यात भरलीया प्रेमाची वस्ती...।
तुझ्याच माग माग फिरुन
दिस रात जागुन
तुझ्यावर प्रेम करुन
तुझ्याच साठी झुरुन
जीवापाड मरुन
तुलाच माझी म्हणून
माझ्या लाडाचं पाखरु गेलया उडून...।