जीवन मरण
जीवन मरण
जगून जगून कसाही जगशील
सगळा हिशेब इथेच करायचा आहे रे
मागचा जन्म, पुढचा जन्म
का कधी कुणी पाहिलाय रे
शेवटच्या घटका मोजशील जेव्हा
अश्रू ढाळायला येतील कित्येक रे
मुक्या शब्दांनी विचारशील त्यांना
आयुष्यभर हसवायला कुणीच कसे नव्हता रे
आयुष्य हे असच असतं
एकटा आलास...एकटाच तू जाशील रे
फरक फक्त त्यांनाच पडतो
ज्यांना जगणं शिकवून जाशील रे
कधी असेही जगून पहा की
लोकांच्या मनात घर करून राहशील रे
ते जगणं ही काय जगणं, ज्याला
फक्त मरणाने येईल शेवट रे
