STORYMIRROR

Shreya Shelar

Tragedy

3  

Shreya Shelar

Tragedy

कुणी नसतं कोणाचं

कुणी नसतं कोणाचं

1 min
237

आज खरंच कुठे मी चुकले असेल का?

याचा शोध करायचा आहे


आजपासून त्याच्याशिवाय का होईना पण

एकटेच जगण्याचा प्रयत्न करायचा आहे


त्याने कायमचे दुरावले मला

हेच मनाला घट्ट समजावयाचे आहे


आज तू परत एकटीच या जगात

हेच त्याला बजावयाचे आहे


कुणी नसतं रे आपलं वेळेवर

याचीच त्याला जाणीव द्यायची आहे


आता तुला एकटेच जगायचे आहे

हेच त्याला आता शिकवायचे आहे


अरे! हे वेडी रडतेस कशाला?

तुला त्याच्यासाठी रडूनही हसायचे आहे


तो खूप सुखात राहावा आयुष्यात

म्हणून तुला दुःखातच जगायचे आहे


विसरायला सांगितले ना त्याने तुला?

मग त्याच्या सुखासाठी तू खरंच विसरलीस हेच तुला त्याला दाखवायचे आहे


चल सोड तो विषय आता कारण...

आजपासून तुला परत त्याच्याशिवाय मरायला शिकायचे आहे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy