गर्भपात करणारी आई, ती वेडी बाई (गर्भातल्या लहानग्या मुलीची खंत)
गर्भपात करणारी आई, ती वेडी बाई (गर्भातल्या लहानग्या मुलीची खंत)
प्रिय,
प्रिय मा़झ्या आईस हे माझं अखेरचं पत्र,
ते डॉक्टरांचे कसले गं होते पोट तपासण्याचे यंत्र
आई माझ्या येण्याची तुला लागली होती चाहुल,
मग का उचललेस सांग तू गर्भपाताचे हे पाऊल
वाटलं नव्हतं मला तू अशी भेदशील,
जन्माला येण्याआधीच माझ्या काळजात छेद करशील
वाटलं नव्हतं मला तू एवढ्या लवकर सोडशील,
दोघांमधली जुळलेली नाळ एवढ्या लवकर तोडशील
त्या नराधम लोकांनी आणली तुझ्यावर गर्भपाताची वेळ,
तू
नव्हता कारायला पाहिजे माझ्या जीवनाशी खेळ
महिती होते देवाला तुम्हाला हवा वंशाचा दिवा,
पण त्यासाठी माझ्या जीवनाशी खेळ कशाला हवा
मुलीच नसतील जगात या सांगा म्हणावं काय करणार?
तुमच्या होणाऱ्या मुलांचे लग्न कोणाशी करणार?
ज्यांनी तुला हे करायला लावलं त्यांना तू प्रश्न कर,
मुलींशीच का लग्न केलं याचं घे तू उत्तर
आई तुला आता फक्त एवढंच सांगते,
आई तुला आता फक्त एवढंच सांगते,
पुढचाही जन्म मी तुझ्याच पोटी मागते