STORYMIRROR

Shreya Shelar

Others

3  

Shreya Shelar

Others

सांग ना कसं विसरू मी तुला

सांग ना कसं विसरू मी तुला

1 min
11.6K

श्वास आहेस तू माझा,

तुझ ऐकण्यासाठी तुला विसरीन,

पण हृदयात असतो ना सहवास तुझा.

सांग ना कसं विसरू मी तुला.


माझ्या अश्रूंनाही ठाऊक आहे मी किती भावूक आहे,

विसरायचा प्रयन्त केल्यावर पापण्या ओल्या करतात,

काहीतरी सांगतात ते मला,

सांग ना कसं विसरू मी तुला.


झोपेतही तुझीच आठवण येते,

सारख तुझंच नाव घेते,

तुझ्या स्वप्नात नेतात त्या मला.

सांग ना कसं विसरू मी तुला.


एक वेळ कविता करायचे सोडेन,

माझ्या कवितेच झाड तुझ्यासाठी मोडेन.

पण नाही विसरू शकत मी तुला,

सांग ना कसं विसरू मी तुला.


तुझ्या त्या हाताचा स्पर्श,

मनात रुजून आहे कित्येक वर्ष.

कसा जाणार सहवास तुझा सांग मला,

सांग ना कसं विसरू मी तुला...


Rate this content
Log in