STORYMIRROR

Shreya Shelar

Tragedy

3  

Shreya Shelar

Tragedy

आपणच ठरवलं होत ना रे

आपणच ठरवलं होत ना रे

1 min
11.7K

आपणच ठरवल होतं ना रे

कधीच सोडायची नाही साथ एकमेकांची

पण, आयुष्यात कुठे काय ते मोठे वादळ आले

अन्, आपल्याला एकमेकांपासून दूर करून गेले...


कधीतरी विचार कर रे परत येण्याचा

मी नाही काही बोलेन तुला

तू फक्त माझ्याकडे येण्याचा प्रयत्न तर कर

मी स्वीकारेन तुला सगळ्या दुःखासहित

नको देऊस सुख मला

पण असा एकटा तरी नको सोडून जाऊस...


माहित आहे रे मला

तू फार जिद्दी आहे

नाही येणार तू परत तरी मी वाट पाहीन तुझी

या श्वासाचा अंत होईपर्यंत...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy