STORYMIRROR

Raghu Deshpande

Abstract Drama Tragedy

3  

Raghu Deshpande

Abstract Drama Tragedy

मृत्यू नंतरचा त्रास..!

मृत्यू नंतरचा त्रास..!

1 min
251

काही त्रास होता का...?

कसे काय झाले अचानक...?

माझी परवा तर भेट झाली

बडबड जास्त होती जरा....!


बघायला पाहिजे हो

या वयात काळजी घ्यावी

सगळे परेशान होतात ना मग

धावपळ होते जरा.....!


बोलायचा लाग नव्हता

मन मर्जी वागायचें

ऐकतच नव्हते हट्टीपणा

बीपी शुगर होते जरा....!


आपल्या काही हाती नाही

सगळे इथेच सोडायचे

खूप कष्टात जीवन गेले

आता दिवस होते बरे जरा...!


मुलगा कुठवर आलाय

निघायचेन समजल्यावर

गाडीघोडी आहे न दाराशी

प्रेमच पाहिजे हो जरा.....!


अरे बराच वेळ झालाय

चोविस तास होवून गेलें

कोण यायचें राहीले आता

गडबड आता करा जरा...!


लाकडं ओली आहेत रे

घासलेट टाक बाजूने

डोक्याखालचे चंदन

निट सरकवून ठेवा जरा...!


सुतक किती दिवसाचें

तिसरा कधी पडतो मग

बारा तेरा चौदा कुठे करता

गंगेला पाणी गढूळ जरा...!


अबाबाबा. . काय काळजी

किती बरे आत्मीयता ...!

निर्णय घाई गडबडीत 

माझेच चुकला जरा...!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract