साधे सरळ
साधे सरळ

1 min

192
नको धन दौलत
दोन शब्दांची आस
चार चौघां सारखा
नको म्हणूस खास... १
सामान्य माणसांचे
अतिसामान्य स्वप्ने
माझे म्हणून कुणी
भावनांना जपणे... २
न मागणी कशाची
न हवा सहवास
राहो -हुदयी थोडा
मनात अधिवास... ३
बांधिले न वचने
चांदणे तोडणार
स्वयंवर समयी
धनुष्य तोलणार... ४
त्याग असतो श्रेष्ठ
नसते अभिलाषा
पाहून ओढतो मी
हाता वरील रेषा... ५