शिकायत....
शिकायत....

1 min

163
कल्पवृक्ष आणि
कपिला गाईंचा
मनाने घेतलेला
दिशाहीन मागोवा....
वास्तवाच्या लाटांनी
जमिनदोस्त होणारी
कल्पनांची इमारत....
स्वप्नांच्या जगात
मृगजळा भोवती
आशा- निराशेचा
चाललेला लपंडाव.....
जगातील विद्वानांनी
रचलेला
सत्य आणि असत्याचा
भुलभुलैय्या...
पांडुरंगा,
एवढे सारे केले
भरकटण्यासाठी,
एकदा सद्बुद्धी दिली असती
वारीला येण्याची
तर काही बिघडले असते का तुझे....?