STORYMIRROR

Subhash Charude

Others Inspirational

3  

Subhash Charude

Others Inspirational

प्रेरणा

प्रेरणा

1 min
13.7K


मज जीवनाची तूच प्रेरणा

मज ह्रदयाची तूच चेतना

करू किती गुणगान तुझे मी

तू सर्व गुणांची खाण

ह्र्दय तुझे प्रेमाचे आगर

त्यातूनच वाहे स्नेहाचा निर्झर

ममतेची तू मूर्त दिसते

ममतेची तू खाण

करू किती गुणगाण तुझे मी

तू सर्व गुणांची खाण

सत्यवचन तव मुखातूनी येते

हास्य मधूर तव चेहऱ्यावर दिसते

वाणी तुझी मज वाटते मंजूळ

कोकिळे सम छान

करू किती गुणगाण तुझे मी

तू सर्वगुणांची खाण.

स्वभाव तुझा हा शांत मनोहर

परमपित्याची तू कन्या खरोखर

नाव तुजला तुझेच शोभे

तू ही नावासम छान

करू किती गुणगाण तुझे मी

तू सर्व गुणांची खान

मज जीवनाची तूच प्रेरणा

मज ह्र्दयाची तूच चेतना

करू किती गुणगान तुझे मी

तू सर्व गुणांची खान


Rate this content
Log in