अबला न्हवे तू सबला आहे
अबला न्हवे तू सबला आहे
अबला न्हवे तू सबला आहे
सत्य एवढे जाण
या देशाची नारी आहेस
भाग्य तुझे गं महान
तव हृयचा ठाव घेऊनी
अश्रू येती नयनातूनी
नकोसे ढाळून अश्रृंना तू
ते मोत्याहून मोैल्यवान
या देशाची नारी आहेस
भाग्य तुझे गं महान
राणी लक्ष्मी ,देवी अहिल्या .
या देशामध्ये होऊन गेल्या
सावित्रीची तू कन्या आहेस
करते ज्ञानचे दान
या देशाची नारी आहेस
भाग्य तुझे गं महान
कधी जीवनी मेघ दाटते
तव आशेचे पंख छाटले
पंख होऊनी मी येईन तेव्हा
तुज घेण्या उड्डाण
या देशाची नारी आहेस
भाग्य तुझे ग महान
किती सोसल्या मुक यातना
विध्यात्यास मी करीन प्रार्थना
सुख शांती अन समृद्धीचे
चे तिजला वरदान
या देशाची नारी आहेस
भाग्य तुझे गं महान
अबला नव्हे तू सबला आहे
सत्य एवढे जाण
