काळजी
काळजी
जशी घेतो काळजी आपल्या मुलांची
तशीच घ्यावी ती आई- बाबांची
जर घेतली काळजी फक्त मुलांची
तर ती ही घेतील त्यांच्याच मुलांची
मुले नेहमीच अनुकरण करतात
सभोवतालच निरीक्षण करतात
तुम्ही आई- बाबांना जपतात
तेव्हा मुले ही मग तसेच करतात
आनंदी बाल्य ना आई-बाबांच्या हातात
आनंदी म्हातारपण ना मुलांच्या हातात
आनंदी जगणे हे तुमच्याच हातात
बीज कोणते पेरावे हे तुमच्याच हातात
पेराल ते उगवेल हा सृष्टीचा नियम
कराल तसेच होईल हा दृष्टीचा नियम
जीवनात चांगले तेच करीत जा
सदा आनंदी जीवनास सामोरे जा...
